अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- उसने पैसे परत मागितल्याचा राग आल्याने एका महिलेसह अवघ्या ११ वर्षांच्या चिमुकलीस रॉकेल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे.
हे पण वाचा :- कॉपी तपासण्याच्या बहाण्याने एक मुलीच्या अंगाला स्पर्श, प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा !
शेवगाव तालुक्यातील पाथर्डी रोड भागात राहणाऱ्या राणीनागनाथ काळे , वय २८ या महिलेने आरोपी विजय काळे याला दिलेले उसनवार १ लाख २५ हजार रुपये परत मागितल्याने त्याचा राग येवून विजय काळेसह ७ आरोपींनी संगनमत करुन गैरकायद्याचा जमाव जमवून राणी काळे या महिलेच्या अंगावर तसेच मुलगी अश्विनी हिच्या अंगावर रॉकेल ओतून जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला.
हे पण वाचा :- अल्पवयीन मुलगी आणि तिच्या मित्राला मारहाण करून मुलीवर सामूहिक बलात्कार !
तेव्हा अंगावरील रॉकेलने भिजलेली साडी महिलेने काढून फेकली व रस्त्याने जाणाऱ्या लोकांना आरोळ्या मारत वाचवा म्हणून हाक मारली. यावेळी आरोपींनी अश्विनी या ११ वर्षाच्या मुलीला तिच्या अंगावर पडलेल्या रॉकल साडीसह काडीपेटीने पेटवून दिले. यात अश्विनी नागनाथ काळे , वय ११ या लहान मुलीचा मृत्यू झाला.
हे पण वाचा :- 5 वर्षे मंत्री राहूनही जे राम शिंदेना करता आले नाही ते रोहित पवारांनी महिन्यात करून दाखवले !
या भीषण खून प्रकरणातून वाचलेल्या राणी नागनाथ काळे या महिलेने काल वरीलप्रमाणे शेवगाव पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी विजय अवचित काळे , सचिन विजय काळे , अलका विजय काळे , साईनाथ अवचित काळे, कविता साईनाथ काळे, जालूबाई अज्ञान भोसले, वलकीया कचरु भोसले, रा . आसरानगर , पाथडी रोड , शेवगाव यांच्या विरुद्ध खून व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com