Successful Farmer: भारत हा खरं पाहता एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. मात्र देशाचे भविष्य म्हणजे नवयुवक शेतकरी पुत्र आता शेतीपासून (Farming) दुरावत चालले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना (Farmer) शेतीमध्ये सातत्याने नुकसान सहन करावे लागत असल्याने आता शेतकरी पुत्र शेती (Agriculture) नको रे बाबा असा ओरड करत आहेत.
अलीकडे शेतीमध्ये केलेला उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी पुत्र आता शेतीऐवजी आपापली नोकरीच बरी असा युक्तिवाद करताना नजरेस पडत आहेत. विशेष म्हणजे शेतकरी बांधव सुद्धा आपल्या पाल्याने शेती करू नये यासाठी आपल्या पाल्यांना उच्च शिक्षित करून चांगल्या कंपनीत नोकरी करण्यासाठी तसेच उद्योगधंदे करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. मात्र, जर नियोजनबद्ध पद्धतीने शेती केली तर निश्चितच शेतीतून देखील लाखो रुपयांची कमाई केली जाऊ शकते. कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल केला तर निश्चितच शेतीतून लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) केली जाऊ शकते.
पुण्यातील एका तरुण शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करत लाखो रुपये उत्पन्न कमवून दाखवले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या एका उच्चशिक्षित तरुणाने नोकरीं करण्याऐवजी शेती करण्यास पसंती दर्शवली आहे. तालुक्यातील मौजे मुर्टी येथील नवयुवक हेमंत जगदाळे यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर देखील शेतीमध्ये करिअर घडवण्याचे ठरवले. हेमंत यांनी शेतीमध्ये पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत जिरेनियम या औषधी वनस्पतीची लागवड (geranium farming) करण्याचा निर्णय घेतला.
तीन वर्षांपूर्वी हेमंत यांनी आपल्या एक एकर क्षेत्रात जिरेनियम या सुगंधित औषधी वनस्पतींची लागवड केली. पहिल्याच वर्षी हेमंत यांना जिरेनियम शेतीतून चांगले उत्पन्न मिळाले. यामुळे हेमंत त्यांचे मनोबल वाढले आणि त्यांनी हळूहळू जिरेनियम शेतीचे क्षेत्र वाढवले. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की आजच्या घडीला हेमंत यांच्याकडे जवळपास दहा एकर क्षेत्र जिरेनियम शेतीच्या खालील आहे.
मित्रांनो खरे पाहता सुरुवातीला एक एकर क्षेत्रातुन ज्या वेळी हेमंत यांनी जिरेनियम शेती उत्पादन घेतले त्यावेळी हेमंत यांना जिरेनियम तेल काढण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र मग हेमंत यांनी जिरेनियम ची लागवड वाढल्यानंतर स्वतःचे तेल काढण्याचे युनिट बसवले. आजच्या घडीला हेमंत यांना उत्पादित केलेल्या जिरेनियम तेलातून साडेअकरा हजार रुपये प्रति लिटर असा दर मिळत आहे. एवढेच नाही हेमंत यांनी जिरेनियम रोपवाटिका देखील सुरू केली आहे.
त्यांच्या रोपांना आज राज्यभरातून मोठी मागणी आहे. हेमंत आज रोपवाटिकेतून आणि जिरेनियम शेतीतून जवळपास 30 ते 35 लाख रुपये वार्षिक कमवत आहेत. निश्चितच हेमंत जगदाळे या नवयुवक शेतकऱ्याने नोकरी न करता शेती करण्याचा जो निर्णय घेतला तो त्याच्यासाठी फायद्याचा ठरला असून यामुळे अनेक नव युवकांना आता प्रेरणा देखील मिळणार आहे.