…..पण टोपीची औकात काय ? – राठोड

Ahmednagarlive24
Published:

नगर :आमदार शिवाजी कर्डिले जे बोलतील ते कधीच करत नाहीत. डॉ. सुजय विखे कोणाला बरोबर घेऊन फिरत आहेत, त्यांना ठावूक नाही. 

कर्डिले हे विखे यांचे कधी सर्जिकल स्ट्राईक करतील समजणार देखील नाही. टोपीची महती काय आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यांचा आजवरचा इतिहास पाहिल्यास लक्षात येईल, असे टीकास्त्र नगर तालुक्यातील महाआघाडीचे माजी आमदार अनिल राठोड, शशिकांत गाडे, बाळासाहेब हराळ, गोविंद मोकाटे यांनी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यावर सोडले. 

राठोड म्हणाले, कर्डिले आम्हाला हिणवतात, पण टोपीची औकात काय आहे, आम्हाला चांगले माहीत आहे. इतर प्रमुख वक्त्यांनीही शिवाजी कर्डिलेंनाच टीकेचे लक्ष्य केले. 

शशिकांत गाडे म्हणाले, आमदार कर्डिलेंच्या शेंडीतील या मेळाव्यात त्यांचेच कार्यकर्ते उघडपणे जावयांचा अपमान सहन करणार नाही, अशी भाषा करतात. 

त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गावांची व नावांची यादी आम्ही देतो, निकालानंतर विखेंनी ती तपासावी. ते जसं बोलतात तसं कधी करत नाहीत. श्रीगोंदे मतदारसंघात बबनराव पाचपुतेंचा पराभव होण्यास कर्डिलेच कारणीभूत आहेत.

गेली विधानसभा, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसैनिकांच्या जीवावर कर्डिले आमदार झाले. नंतर कर्डिलेंनी उपकार विसरून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. 

किंगमेकर म्हणतात, मग स्वत: लोकसभेला का पडले? तालुक्यात ६ पैकी एकही जिल्हा परिषद यांना जिंकता आली नाही, अशी टीका गाडे यांनी केली. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment