डंपरच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शहरातील दिल्लीगेट परिसरातील मेहतर कॉलनी येथे काल रविवारी डंपर आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. वीणा सनद दिवाणे (वय ३५, रा. टिळकरोड) असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे.

डंपर हा चालला असतानाच स्कुटीची धडक बसली. डंपरच्या मागच्या टायरला स्कुटीची धडक झाली. त्यात स्कुटीवरच्या वीणा यांना डंपरच्या मागच्या टायरचा जोराचा मार लागला.

त्या रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यातही त्यांच्या डोक्याला इजा झाली. अपघात होताच त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांना तिथे वैद्यकीय अधिकायांनी मृत घोषित केले. तोफखाना पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, नगर शहरातील दिल्ली दरवाजा परिसरातील रस्त्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन महिन्यापासून हे काम सुरू आहे. रस्त्याच्या कामामुळे वाहतुकदार पर्यायी मार्ग शोधत असतात. त्यामुळे बालिकाश्रम रोडवरून वाहतुकीचे प्रमाण वाढले आहेत.

त्यातच जड वाहनांचे प्रमाण देखील वाढले आहे. परिणामी शहरातील रस्त्यांवर अपघातांची मालिका सुरू आहे. शहरातील रस्त्यांचे कामे पूर्ण होईपर्यंत जड वाहनांना प्रवेश देवू नये अशी मागणी नगरकरांकडून होत आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com