शपथविधीला प्रथम क्रमांक, विखे पाटील म्हणाले, हा तर…

Published on -

Maharashtra News:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना मंत्रिपद मिळणार हे नक्की मानले जात होते.

मात्र, आजच्या सोहळ्यात अनपेक्षिपणे त्यांचे नाव प्रथम क्रमांकालाच पुकारले गेले. त्यामुळे त्यांच्या लोणी गावात जल्लोष करण्यात आलाच, पण विखे पाटील यांनाही हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे म्हटले.

नगर जिल्ह्यात विखे पाटील यांना विरोधीपक्षांसोबतच स्वपक्षीयांचाही विरोध असतो. हे वातावरण सध्याही कायम आहे. अशा परिस्थितीत भाजप आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी विखेंना ही मोठी संधी दिली आहे.

यातून त्यांचे पक्षातील वजन सिद्ध झाले असून यातून आता पक्षांतर्गत विरोध कमी होण्यास मदत होईल, असे चित्र आहे. शपथविधीनंतर विखे यांच्या लोणी गावात जल्लोष करण्यात आला.

मुंबई येथे राज्‍यासह नगर जिल्‍ह्यातून आलेल्‍या कार्यकर्त्‍यांनी विखे पाटील यांचा सत्कार केला. तेथे विखे पाटील यांनी सर्वांशी संवाद साधला.

सर्वांच्‍या सहकार्यामुळेच ही मोठी संधी आपल्‍याला मिळाली असल्‍याचे सांगतानाच ज्‍या विभागाचा मंत्री म्‍हणून काम करण्‍याची संधी पक्ष देईल ती आपण यशस्‍वीपणे पार पाडू अशी ग्‍वाही त्यांनी दिली.

पक्षाने मला आज प्रथम क्रमांकावर शपथ घेण्‍याची दिलेली संधी सुध्‍दा माझ्या दृष्‍टीने आनंदाचा क्षण ठरला आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe