अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील टाकळी परिसरात राहणाऱ्या एका गरीब कुटुंबातील १५ वर्ष वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला गोड बोलून तिच्या घरी जावन तिच्या आजीला जिवे मारण्याची धमकी देवून आरोपी अविनाश नारायण पंडोरे,वय २८, रा . मोहिनीराजनगर,कोपरगाव या नराधम तरुणाने जबरी बलात्कार केला.
दि . २२ / ११ / २०११ रोजी तसेच ३ जानेवारी २०२० रोजी,८ जानेवारी २०२० रोजी, १५ जानेवारी २०२० रोजी आजीला मारण्याच्या धमकी देवून गरीब विद्यार्थिनीच्या इच्छेविरुद्ध नराधम आरोपी अविनाश पंडोरे याने जबरी संभोग करत बलात्कार केला.
पिडीत विद्यार्थिनीने कोपरगाव शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी अविनाश नारायण पंडोरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. डिवायएसपी वाघचोरे, पोनि मानगावकर यांनी घटनास्थळी भेट दिली. स्वतः डिवायएसपी वाघचौरे हे पुढील तपास करीत आहेत. या घटनेने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.