अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- भिंगार ते श्री क्षेत्र शिर्डीसाठी निघालेल्या साईबाबा पायी पालखी सोहळ्याच नुकतेच भिंगारमधून प्रस्थान झाले. जय साईरामाच्या गजरात निघालेल्या या दिंडी सोहळ्यातील रथाचे भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने पूजन करुन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, दिपक घोडके, रमेश वराडे, सुंदरराव पाटील, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष अभिजीत सपकाळ, विठ्ठलराव निमसे, नंदकुमार आहिरे, डॉ.अतुल मडावी, महेश झोडगे, रवी धाकतोडे, किरण फटांगरे, किशोर सोमाणी, गुलाबराव कारडामे, ज्ञानेश्वर अनावडे, सुनिल वराडे, रेखाताई मडावी, विद्या जोशी आदी उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, साईबाबांनी श्रध्दा व सबुरीसह मानवतेचा संदेश दिला. सर्वधर्मसमभाव हीच त्यांची खरी शिकवण होती. तर मानवता हाच धर्म त्यांनी जोपासला. त्यांचे विचार व शिकवण आत्मसात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. दिंडीचे हे नऊवे वर्ष असून, पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले होते. महिला भजनी मंडळींनी भजनाने सर्वांचे लक्ष वेधले.