जीभ घसरली नाही, हा खासदार खरंच म्हणतोय तिरंगा फडकवू नका

Ahmednagarlive24 office
Published:

 India News:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर हर घर तिरंगा मोहिम राबवली जात आहे. त्यामुळे प्रत्येक घरावर तिरंगा फडविण्याचे आवाहन लोकप्रतिनिधीही आपल्या मतदारसंघातील लोकांना करीत आहेत.

पंजाबमधील शिरोमणी अकाली दलाचे (अमृतसर) प्रमुख आणि खासदार सिमरनजीत सिंह मान यांनी मात्र एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. १४ व १५ ऑगस्टला लोकांनी घरावर तिरंगा फडकवू नये, असे ते म्हणालेत.

होय, बोलताना त्यांची जीभ घसरलेली नाही. तिरंगा का फडकवायचा नाही, याचे कारणही त्यांनी सांगितले आहे. पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार असलेल्या सिमरनजीत यांनी लोकांना हर घर तिरंगा मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी म्हटले आहे, “१४-१५ ऑगस्टला घर आणि कार्यालयात निशाण साहीब फडकवण्याची मी विनंती करतो. दीप सिद्धू आज आपल्यात नाहीत.

त्यांनी सांगितले होते की शीख स्वतंत्र आणि एक वेगळा समुदाय आहे.” सिमरनजीत हे फुटीरतावादी नेते आहेत. यावरून आता वाद उफाळला असून भाजपने यावर टीका केली आहे.

आम आदमी पार्टीनेही टीका केली आहे. काही खलिस्तानवादी नेत्यांनी या खासदाराचे समर्थन केले असून स्वातंत्र्यदिनी खलिस्तानी झेंडा फडकावण्यास सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe