अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- आगामी कॅन्टोंमेंट निवडणुकीत सर्वच्या सर्व 7 जागा जिंकून काँग्रेस आघाडीचा झेंडा फडकवला जाईल, असा विश्वास काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळूंके यांनी व्यक्त केला. भिंगार शहर काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री.साळूंके बोलत हाते.
अध्यक्षस्थानी कॅन्टों.चे माजी उपाध्यक्ष तथा पक्षाचे शहर अध्यक्ष अॅड.आर. आर.पिल्ले होते. ‘गांव तेथे शाखा’ या पक्षाच्या अभियानाच्या नियोजनासाठी भिंगार येथे बैठक घेण्यात आली. यावेळी बोलतांना श्री.साळूंके यांनी आगामी कॅन्टोंमेंट बोर्ड निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मान्यता देत ही निवडणूक जिंकून घेऊ असा विश्वास व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, राज्याचे महसूल मंत्री तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल प्रगतीकडे जात असून, पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करु हा त्यांचा निर्धार लक्षात घेऊन पक्ष गाव तेथे अभियानातंतर्गत भिंगार शहरात 7 शाखा प्रभागावर करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी साळूंके यांचा कमिटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. प्रारंभी स्वागत महिला अध्यक्षा श्रीमती मार्गारेट जाधव यांनी केले. सभाध्यक्ष अॅड.पिल्ले यांनी भिंगार काँग्रेस कमिटी कार्याचा आणि कॅन्टोंमेंट निवडणूक सद्यस्थितीचा अहवाल दिला.
यावेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, प्रदेश सदस्य शामराव वाघस्कर, अॅड.साहेबराव चौधरी, प्रवक्ता रिजवान शेख, सरचिटणीस सोपान साळूंके, अनिल परदेशी आदिंची भाषणे झाली. यावेळी सर्वश्री रमेश त्रिमुखे, अनिल वराडे, लक्ष्मण साखरे, संजय झोडगे, संतोष धीवर, निजाम पठाण,
रजनी ताठे, जालिंदर अळकुटे, संतोष फुलारी, प्रमोद मोहिते, शरद वाघुबरे, संतोष कोलते, अच्युत गाडे, सुभाष त्रिमुखे, समिर पठाण, वसिम सय्यद, असिफ गुलाम, वैभव चिनके, संतोष कांबळे, दिपक लोखंडे, संजय खडके, सुनिल उल्हारे आदि उपस्थित होते.