चिमुरड्यांना मिठी मारल्याचे हे मिळतात फायदे

Ahmednagarlive24
Published:

लहान मुले दिसल्यावर आपण लगेच त्यांना प्रेमाने मिठी मारतो. ही मिठी त्याच्या आरोग्यासाठीही चांगली असते हे सिद्ध झाले आहे. आपल्या काळजाचा तुकडा असलेल्या चिमुकल्यांना वारंवार मिठी मारण्याच आपल मनं करत. यामुळे त्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीत वाढ होण्यास मदत होते. ह्रद्याचे ठोके सामान्य होऊन शरीरराचे तापमान स्थिर होण्यासही याने मदत होते.

आई आणि मुलांच्या मिठीतील ताकद समोर आणण्यासाठी डायपर कंपनी असलेल्या हग्गीजने दिल्ली, मुंबई, बंगळूर, चेन्नई आणि कलकत्तामध्ये २००० हून अधिक मातांचे आणि ५०० हून अधिक चिकित्सकांचे सर्वेक्षण केले.

साधारण ७६ टक्के चिकित्सकांचे एका विषयावर एकमत झाले की आईने मिठी मारल्यावर शिशुची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मिठी मारल्याने हे फायदे होत असतील तर मिठी मारणे हे कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही. ते शिशुच्या ह्रदयाच्या गतीला सामान्य करते. ऑक्सिजनची पातळी वाढण्यास मदत करते. त्याचसोबत मुलांचे रडणे, ओरडणे इतर समस्यांनाही मारलेली मिठी हे योग्य उत्तर असते.

आईने मिठी मारल्यावर हार्मोन्सची असी प्रक्रीया होते की, बाळाच्या शरीराचे तापमानाच्या विनिमयात मदत पोहोचते. साधारण ८५ टक्के चिकित्सक बाळांना मिठी मारण्याचे फायदे लक्षात घेवून मातांना तसे सल्ले देतात.

८० % महिला अनभिज्ञ

हे सर्वेक्षण अथवा वैज्ञानिकदृष्टा निष्पन्न झाले असले तरी ८० % महिलला या माहीतीपासून अनभिज्ञ आहेत. तरीही बाळांना मिठी मारण्याच्या सवयीने त्यांच्या बाळाच्या आरोग्यास फायदे होत असतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment