अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नगरमध्ये सभा घेणार आहेत.
ही सभा सावेडीतील संत निरंकारी भवनाशेजारच्या मैदानावर होणार आहे. या मैदानाची पोलिस प्रशासनाने पुन्हा पाहणी केली.
मोदी यांच्या सभेसाठी झेड प्लस सिक्युरिटी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हे मैदान योग्य असल्याने तेथे सभा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सभेसाठी लागणाऱ्या आवश्यक परवानग्या घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून सभेची तारीख येत्या दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.
- शिवसंग्राम पक्षाचा महायुतीला पाठिंबा
- शहरातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवले
- Shukraditya Rajyog 2024 : मे महिन्यात तयार होत आहे विशेष राजयोग, ‘या’ राशींना करिअरपासून व्यवसायापर्यंत मिळेल यश!
- हातगावच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह कालव्यात सापडला
- बस प्रवासादरम्यान महिलेचे चार लाखांचे दागिने लंपास