Maharashtra News:महाराष्ट्रातील सत्तासंर्घषातून सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या प्रकरणात पहिला दणका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकर यांच्या गटाला बसला आहे.
त्यांची एक याचिका सुप्रिम कोर्टाने आज फेटाळाली आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार? याकडे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे? यासंबंधी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू आहे.

तेथे पुढील सुनावणी १९ ऑगस्टला ठेवण्यात आली आहे. तेथे सुरू असलेल्या पडद्यामागील हालचालींची माहिती मिळाल्याने ठाकरे गटातर्फे सुप्रिम कोर्टात आज याचिका दाखल करण्यात आली.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रिम कोर्टाने २२ ऑगस्टला सुनावणी ठेवली आहे. मात्र, त्या आधीच १९ ऑगस्टला निवडणूक आयोगाकडे निर्णय होणार आहे.
त्यामुळे सुप्रिम कोर्टातील सुनावणी त्यापूर्वी घ्यावी, अशी मागणी ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे करण्यात आली.
मात्र, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. नियोजित वेळापत्रकानुसार २२ ऑगस्टरोजीच या प्रकरणावर सुनावणी होईल, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले आहे.