अहमदनगर : अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन भाजपाचे उमेदवार डॉ सुजय राधाकृष्ण विखे पाटील यांनी विराट शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.
विशेष म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे विरोधी उमेदवार संग्राम जगताप यांचे सासरे भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले उपस्थित होते.
दिल्लीगेट येथून भव्य रॅलीचे नियोजन करण्यात आले होते. डॉ.सुजय विखे पाटील यांनी तीन उमेदवारी भरले. ही निवडणूक विकासावर लढवायची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली व पक्षाच्या विचारानुसार मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम आपण करायचे आहे, असे ते कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले.
यावेळी जिल्ह्यातील युतीचे सर्व आमदार, झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य,कार्यकर्ते मोठ्या संख्येने जनसमुदाय जमला होता.
- जिल्ह्यात नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणाऱ्यांची निर्मिती करणार : डॉ. सुजय विखे पाटील.
- Hyundai Exter EV : ह्युंदाईची इलेक्ट्रिक SUV लवकरच होणार लॉन्च, थेट टाटा पंचला देईल टक्कर!
- Ahmednagar News : अर्बन ठेवीदारांना दिलासा ! वसुली झाली पावणे तेरा कोटी, ६० कोटी वितरणाची प्रशासनाकडून ग्वाही
- Samsung Galaxy : सॅमसंगने स्वस्त केला ‘हा’ 5G फोन, आता खर्च करावे लागणार फक्त ‘इतके’ रुपये…
- NPCIL Mumbai Bharti 2024 : मुंबईत NPCIL मध्ये 400 पदांची मोठी भरती; या तारखेपूर्वी करा अर्ज!