कर्जमाफीपासून हिवरे बाजार वंचित ! कारण वाचाल तर तुम्हालाही धक्काच बसेल !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ नगर तालुक्यातील १५ हजार १९ शेतकऱ्यांना झाला. त्यांचे ९१ कोटी ६५ लाख ८४ हजारांचे कर्ज माफ झाले. आदर्श गाव हिवरे बाजारच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची १०० टक्के वसुली असल्याने त्यांचा एकही कर्जदार थकीत नसल्याने ते गावच कर्जमाफीपासून वंचित राहिले.

२०१४ ते २०१९ या कार्यकाळातील भाजप-शिवसेना सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अटी-शर्तीमुळे टीकेची लक्ष्य झाली होती. शिवसेना- राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडी सत्तेवर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्याच अधिवेशनात विनाअटी-शर्ती सरसकट दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली.

कर्जमाफी मिळवण्यात नगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला. नगर तालुक्यातील १५ हजार १९ शेतकऱ्यांचे तब्बल ९१ कोटी ६५ लाख ८४ हजारांचे कर्ज माफ झाले आहे.नगर तालुक्यात ११० विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या असून त्या कर्जासाठी जिल्हा सहकारी बँकेशी संलग्न आहेत.

त्यातील १०९ सेवा सोसायट्या दुष्काळ आणि विविध कारणांनी थकीत होत्या. त्यातील २ लाखांपर्यंत कर्ज असणाऱ्या १५ हजार १९ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. आदर्श गाव हिवरे बाजार येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीची वसुली १०० टक्के असल्याने त्या गावात कोणीही थकीत शेतकरी नव्हता. त्यामुळे ते गाव कर्जमाफीपासून वंचित राहिले.

शासनाने कर्जमाफीचा लाभ पहिल्या टप्प्यात २ लाखांपर्यंत थकीत कर्जदारांना दिला आहे. पोपटराव पवार यांच्या आदर्श गाव हिवरे बाजारची विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी गेली १० वर्षे नियमित मार्चअखेर १०० टक्के कर्जवसुली करते.

सेवा सोसायटीच्या १९१ कर्जदारांकडे १ कोटी ५५ लाखांचे कर्ज असून ते प्रामाणिकपणे नियमित कर्जफेड करतात. शासनाच्या थकीत शेतकरी या शब्दाचा फटका त्यांना बसला असून १०० टक्के वसुली असल्याने हिवरे बाजार कर्जमाफीतून वंचित राहिले. १०० टक्के वसुलीमुळे आदर्शाचा तोरा कर्जमाफीचा कागद राहिला कोरा अशी अवस्था हिवरे बाजारची झाली आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment