अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्यावर्षी दुष्काळात राज्य सरकारने सुरू केलेल्या चारा छावणीत जनावरांची संख्या खोटी दाखवून गैरव्यवहार करण्यात आला आहे.
याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. तक्रारी आलेल्या चारा छावण्यांची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पातळीवरील समिती गठित करण्यात आली असून,
समितीचा अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी दिली.
वडेट्टीवार म्हणाले, चारा छावण्यांमध्ये जनावरांची खोटी दाखवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. चारा छावण्यांना परवानगी देतानाचे सर्व नियम धाब्यावर बसवून बिले लाटल्याचे समोर आले आहे.
जनावरांच्या टॅगिंग करणे, परवानगी दिलेल्या जनावरांच्या संख्येपेक्षा अधिक जनावरे दाखवण्यात आली व तशी बिले सादर करण्यात आली. एकट्या बीडमध्ये ६०८ चारा छावण्या होत्या.
त्यासाठी ३४१ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला. मात्र, गैरव्यवहाराच्या तक्रारीमुळे ४५ कोटींची चारा छावणी मालकांची बिले थांबवली आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com