Havaman Andaj Marathi : राज्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस (Rain) बघायला मिळत आहे. उर्वरित राज्यात पावसाचा (Monsoon News) जोर कमी झाला असून काही ठिकाणी श्रावण सरी कोसळत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान राज्यातील हवामानाबाबत (Monsoon) आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. हाती आलेल्या हवामान विभागाच्या (IMD) सुधारित अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. निश्चितच जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात सर्वत्र झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील खरीप हंगामाच्या पिकांची मोठी नासाडी झाली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पहिले दोन आठवड्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे पिकांची नासाडी झाली असून शेतकरी बांधवांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार (Maharashtra Monsoon Update 2022) राज्यात पुन्हा अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात राजधानी मुंबई समवेतच कोकणातील काही जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. शिवाय ठाणे, पालघर तसेच मुंबईत देखील पुढील तीन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे कोल्हापुर सातारा सातारा मधील विशेषता घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज विभागाकडून देण्यात आला आहे. नासिक आणि खानदेश मधील नंदुरबार या जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे.
मित्रांनो जुलै महिन्यात राज्यात पावसाचा सर्वाधिक जोर विदर्भात बघायला मिळाला होता. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला देखील विदर्भात अति मुसळधार पाऊस झाला असून आता पुन्हा एकदा विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. पुढील तीन दिवस विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, नागपूरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त विदर्भातील अकोला अमरावती, वर्ध्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मित्रांनो मराठवाड्यात देखील पाऊस बरसणार असल्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातील जालना, हिंगोली, नांदेड, परभणीत या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे.