अहमदनगर लाईव्ह 24 टीम / मुंबई: आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या एकेरी उल्लेखाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. त्या वक्तव्याबद्दल आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माफी मागितली.
“मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख केलेला नाही. कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही. ती आमची संस्कृती, प्रथा परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे त्यावर ठाम आहोत. असं आशिष शेलार म्हणाले.
मी कुठल्याही राजकीय नेत्याचा वैयक्तिक उल्लेख केलेला नाही, मा. मुख्यमंत्र्यांचा तर नाहीच नाही. ती आमची संस्कृती, प्रथा परंपरा नाही. आम्ही सवाल उपस्थित केला आहे आम्ही त्यावर ठाम आहोत. त्या सवालातील भाषेमुळे कुणाचा अपमान झाला असेल तर त्याची क्षमाही मागू, क्षमा मागतो! – @ShelarAshish pic.twitter.com/2nOYaEpZFA
— Office of Adv. Ashish Shelar (@OfficeofAShelar) February 3, 2020
सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन टीका करताना, आशिष शेलार यांनी कायदा लागू न करणं म्हणजे तुझ्या बापाचं राज्य आहे का, असं म्हटलं होतं. त्याबाबत त्यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं.
मैंने व्यक्तिगत रूप से किसी भी नेता का उल्लेख नहीं किया है, मा. मुख्यमंत्री जी का तो बिल्कुल नहीं। वह हमारी संस्कृती नहीं। हमने जो सवाल उठाया है, उस पर हम दृढ़ हैं । यदि, सवाल की भाषाके वजह से क़िसी का अपमान हूँवा है, तो मैं उनसे माफी माँगता हूँ! – @ShelarAshish pic.twitter.com/9Kwe5jcynt
— Office of Adv. Ashish Shelar (@OfficeofAShelar) February 3, 2020
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com