Panjabrao Dakh : 23 तारखेनंतर राज्यात पावसाची उघडीप, पण ‘या’ दिवशी ‘या’ ठिकाणी पुन्हा पाऊस येणार, पंजाबराव डख हवामान अंदाज

Published on -

Panjabrao Dakh : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाने (Rain) उघडीप दिली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील विदर्भात तसेच घाटमाथ्यावर आणि कोकणातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची (Monsoon) संततधार सुरू असल्याचे चित्र आहे.

राज्यातील इतरही भागात अधून मधून श्रावण सरींची बरसात सुरू आहे. दरम्यान, आपल्या हवामान अंदाजासाठी (Weather Update) संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा उमटवणारे पंजाबराव डख (Panjabrao Dakh News) यांचा देखील हवामान अंदाज आता समोर आला आहे. पंजाब राव यांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार (Panjabrao Dakh Havaman Andaj) राज्यात आज आणि उद्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राज्यात बघायला मिळणार आहे.

मित्रांनो आज आणि उद्या राज्यात भाग बदलत पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव (Panjab Dakh Weather Report) यांनी स्पष्ट केले आहे. या कालावधीत राज्यात कोसळत असलेला पाऊस मुसळधार नसून साधारण पाऊस राहणार आहे. 22 तारखे नंतर राज्यात हवामानात (Monsoon News) मोठा बदल होणार असून 23 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट दरम्यान राज्यात पावसाची उघडीप राहणार असून राज्यात सर्वत्र सूर्य दर्शन राहणार आहे.

26 ऑगस्ट नंतर पुन्हा राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस हजेरी लावणार असल्याचे पंजाबराव यांनी नमूद केले आहे. 27 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान बरसणारा पाऊस हा दक्षिण महाराष्ट्रात राहणार आहे. एकंदरीत, जुलै आणि ऑगस्ट मध्ये विदर्भात बरसणारा पाऊस आता दक्षिण महाराष्ट्राकडे वळणार आहे. यामुळे तूर्तास तरी विदर्भ वासीयांना दिलासा मिळाला असेल.

मित्रांनो असे असले तरी राज्यात मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे तसेच ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात झालेल्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकरी बांधवांची खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली होती. सध्या मागील महिन्यात झालेल्या जोरदार पावसापासून वाचलेली पिकांच्या व्यवस्थापनात बळीराजा दंग असल्याचे चित्र आहे.

अशा परिस्थितीत तीन-चार दिवस पावसाची उघडीप मिळणार असल्याने बळीराजाला शेती कामात मदत होणार आहे. पंजाबराव यांनीदेखील शेतकरी बांधवांना पावसाची उघडीप राहिली तेव्हा शेतीची कामे करावीत असा सल्ला दिला आहे. निश्चितच खरीप हंगामातील बहुतांशी पिके पाण्याखाली गेली असली तरी देखील काही भागात पिके जोमात असल्याचे चित्र आहे. यामुळे निश्चितच उत्पादनात घट होणार आहे मात्र असे असले तरी वाचलेल्या पिकांना पोषण देण्यासाठी बळीराजा मोठ्या शर्तीने लढाई लढत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe