Maharashtra News : महाराष्ट्रतील सत्तासंघर्ष संबंधी आज सुप्रीम कोर्टात होणारी सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. आता ती उद्या २३ ऑगस्टला होणार आहे.
शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटामध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षाचा फैसला वारंवार लांबणीवर पडत आहे. आज२२ ऑगस्टला सुनावणी नक्की होणार असल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र ती एकदा लांबणीवर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयातील त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. आता ही सुनावणी मंगळवारी (२३ ऑगस्ट) होण्याची शक्यता आहे.