मुंबई मार्केटला सतरा पिशव्या प्लॉवर पाठविला, पट्टी आली साडे नऊ रुपये

Published on -

Maharashtra News : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील शेतकरी किसन फराटे यांनी दोन एकरमध्ये फ्लॉवरचे पीक घेतले. मात्र, हा फ्लॉवर तोडून जेव्हा मार्केटला व्यापाऱ्याकडे पाठवला तेव्हा त्याला या मालाची अवघी साडेनऊ रुपयांची पट्टी आली.

शेतकऱ्यांना शेती करणे कसे अवघड झाले आहे, याकडे लक्ष वेधण्यासाठी फराटे यांनी ही साडे नऊ रूपयांची रक्कम चेकद्वारे संबंधित व्यापाऱ्याला परत पाठविली आहे.

मांडवगण फराटा येथील शेतकरी किसन फराटे यांनी उसाच्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून फ्लॉवर हे पीक दोन एकरमध्ये घेतले होते. त्यात फ्लॉवरच्या सतरा पिशव्या त्यांनी मुंबई येथील वाशी मार्केटमध्ये व्यापाऱ्याकडे विक्रीसाठी पाठवल्या होत्या.

त्याच्या विक्रीतून खर्च वजा जाता फक्त साडेनऊ रुपयेच मिळाले. सतरा पिश्या फ्लॉवरचा लिलाव २ हजार ६८४ रुपयांना झाला.

मात्र, हमाली, वाहतूक, तोलाई असा खर्च दोन हजार ६७५ रुपये झाला. उरलेले साडे नऊ रुपये फराटे यांना देण्यात आले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News