अहमदनगर :- ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील पुढील पंधरा दिवसांत काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. एका वृत्तवाहिनीवर बुधवारी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे संकेत दिले.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डाॅ. सुजय नुकताच भाजपत गेला आहे. भाजपने त्याला दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे.
विखे पाटील आजही काँग्रेसमध्येच आहेत. मात्र, मुलाच्या प्रचारार्थ ते सर्व तऱ्हेची अप्रत्यक्ष मदतही करत आहेत.
आता ‘अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची वेळ आली आहे. पुढच्या पंधरा दिवसांत मी आणखी एक मोठा निर्णय घेणार आहे.
त्यामुळे नक्कीच भूकंप होईल,’ असे विखे पाटील यांनी मुलाखतीत सांगितले.
आता भाजपचाच पर्याय विखे यांनी काँग्रेस विधिमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
मात्र, निवडणुकीच्या तोंडावर अधिक चर्चा नको तसेच त्यामुळे राष्ट्रवादीला रान मिळेल, म्हणून काँग्रेसने हा निर्णय प्रलंबित ठेवल्याचे सांगितले जाते.
- 1 जुलैपासून नवीन रेल्वे भाडेवाढ लागु, पण तिकीट आधीच बुक केलंय? जाणून घ्या, प्रवासादरम्यान वाढीव शुल्क लागेल का!
- दाट, लांब आणि रेशमी केस हवेत? घरच्याघरी करा ‘हे’ 7 चमत्कारी उपाय! आठवड्याभरात दिसू लागेल परिणाम
- केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट! तरुणांना पहिल्या नोकरीनंतर मिळणार ₹15,000, जाणून घ्या ही भन्नाट स्कीम
- प्रोजेक्ट विष्णूने शत्रू देशात खळबळ! भारत एकाचवेळी बनवणार 12 हायपरसोनिक मिसाईल्स; तब्बल 2,000 किमी रेंजने करणार शत्रूवर मारा
- नेटवर्कशिवाय कॉलिंग? Tecno चा भन्नाट फीचर्सवाला स्मार्टफोन उद्या होतोय लाँच! ड्युअल सिम, डॉल्बी अॅटमॉस आणि तब्बल 6000mAh बॅटरी मिळणार