Maharashtra News : मुंबईतील विलेपार्ले येथील शिवशंभू गोविंदा पथकांचा सदस्य संदेश प्रकाश दळवी शुक्रवारी दहीहंडी फोडताना सातव्या थरावरून खाली पडला होता. गंभीर जखमी झालेल्या दळवी याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
यावरू आता विरोधक आक्रमक होऊन सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. दळवी हा सर्वात वरच्या थरावर होता. त्याने दहीहंडी फोडलीही. मात्र, त्याचवेळी खालच्या थरातील गोविंदा हलले.

त्यामुळे संदेश दळवी हंडीला पकडून हवेत लोंबकाळ खाली पडला. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मात्र, दोन दिवस मृत्युशी झुंज दिल्यानंतर सोमवारी रात्री संदेश दळवीची प्राणज्योत मालवली.
मुंबईसह ठाण्यात एकूण २२२ गोविंदा जखमी झाले होते. त्यापैकी १९७ गोविंदांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले होते. तर २५ गोविंदांची दुखापत काहीशी गंभीर स्वरुपाची असल्याने ते अजूनही रुग्णालयात आहेत.
आता पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे. आज सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
यांच्याकडून सरकारला घेरले जाऊ शकते. तर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनीही आपण सभागृहात आज हा मुद्दा उपस्थित करु असे म्हटले.