Asia Cup 2022: आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान (Ind Vs Pak T20) सामना 28 ऑगस्ट रोजी दुबई येथे होणार आहे.
दोन्ही संघांना क्वालिफायर (Qualifier) संघासह अ गटात ठेवण्यात आले आहे. अफगाणिस्तान (Afghanistan) , बांगलादेश (Bangladesh) आणि श्रीलंका (Sri Lanka) ब गटात आहेत.

27 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून पहिला सामना श्रीलंका आणि अफगाणिस्तान (Sri Lanka Vs Afghanistan) यांच्यात होणार असून दुसऱ्या दिवशी IND v PAK सामना होणार आहे. तर जाणून घ्या तुम्ही ते मोबाईलवर फ्री कसे पाहू शकता.
India Vs Pakistan Live Streaming: कुठे पाहायचे
आशिया चषक भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर (Star Sports network) प्रसारित केला जाईल आणि डिस्ने+हॉटस्टार (Disney+Hotstar) इव्हेंटचे ऑनलाइन कव्हरेज प्रसारित करेल, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका यांसारख्या अन्य उपखंडात हेच नेटवर्क आशिया चषक 2022 चे थेट कव्हरेज प्रदान करेल
India Vs Pakistan Live Streaming: विनामूल्य कसे पहावे?
Jio वापरकर्त्यांनी काय करावे
तुम्ही जिओ वापरकर्ते असल्यास, तुम्ही एका प्लॅनसह Disney+Hotstar एका वर्षासाठी मोफत घेऊ शकता. जिओ 499 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आणते, ज्यामध्ये 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे आणि दररोज 2 GB डेटा ऑफर केला जातो. डिस्ने + हॉटस्टारला या प्लॅनसह सब्सक्रिप्शन देखील मिळते.
Airtel वापरकर्त्यांनी काय करावे
जर तुम्ही एअरटेल यूजर असाल तर तुम्ही 399 रुपयांचा प्लान निवडू शकता. याची वैधता 28 दिवस आहे आणि दररोज 2.5GB डेटा उपलब्ध आहे. या प्लॅनसह, तुम्हाला तीन महिन्यांचे Disney + Hotstar सब्सक्रिप्शन मिळेल.
Vi वापरकर्त्यांनी काय करावे
जर तुम्ही Vi वापरकर्ता असाल तर 499 रुपयांची योजना बेस्ट आहे. तसेच त्याची वैधता 28 दिवसांची आहे. 2G डेटा दररोज दिला जातो. Disney + Hotstar सबस्क्रिप्शन देखील उपलब्ध आहे. तेही वर्षभरासाठी.