Maharashtra News: रस्ते वाहतुकीशी संबंधीत सतत नव्या योजना आणणारे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणखी एक भन्नाट योजना घेऊन आले आहेत.
त्यानुसार आता महामार्गांवरील टोलनाकेच काढून टाकण्यात येणार आहे. त्यांची जागा स्मार्ट कॅमेरे आणि वाहनांच्या नंबर प्लेट यांच्या आधारे टोल वसूली करणारी यंत्रणा घेणार आहे.

याचा प्रयोग सुरू केल्याची घोषणा गडकरी यांनी केली. सध्या फास्टटॅग द्वारे टोल वसूल केला जातो. मात्र, आता नवी योजना आणली आहे.
राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके बंद करून त्याऐवजी स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरा बसवण्यात येणार असून या कॅमेरा द्वारे आता टोल वसूली केली जाणार आहे.
हे कॅमेरे वाहनांच्या नंबर प्लेट्सचा फोटो घेऊन वाहन मालकाच्या नंबर प्लेटला जोडलेल्या बॅंक खात्यातून थेट पैसे ही सरकारच्या खात्यात जमा होणार आहे.
यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही वेगवान होऊन टोल पासून मुक्ती मिळेल. सध्या काही ठिकाणी हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविला जात असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
वाहन चालकांनी कॅमेरा चुकवण्याचा प्रयत्न केला तर काय कारवाई होणार. चलकाच्या बॅंक खात्यात जर पैसे नसेल, तर काय केले जाईल, यासाठी आपल्याला कायदा आणावा लागेल असेही गडकरी म्हणाले.