Farmer Scheme : भारतातील शेतकरी (Farmer) आता केवळ पारंपारिक शेतीपुरते (Farming) मर्यादित राहिलेले नाहीत. आता देशातील शेतकरी प्रगत शेती तंत्राचा उपयोग करून आपले उत्पन्न वाढवत आहेत. शेतकरी बांधवांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा तसेच यंत्राचा उपयोग करून आपले उत्पन्न दुपटीने वाढवावे या उद्देशाने शेतकऱ्यांना कृषी ड्रोनचा (Agriculture Drone) अवलंब करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कृषी ड्रोनच्या मदतीने, कीटकनाशके आणि इतर द्रव खतांची फवारणी अगदी काही मिनिटात करता येणे शक्य आहे. एवढेच नाही तर आता कृषी ड्रोनचा उपयोग करून शेतांचे संरक्षण आणि निरीक्षण करणे अगदी सोपे बनले आहे. एकंदरीत काय कृषी धोरणामुळे शेती करणे शेतकरी बांधवांना अतिशय सुलभ झाले आहे. याच्या वापरामुळे शेतकऱ्यांचे कष्ट आणि संसाधने दोन इंची मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे.
यामुळे शेतकरी बांधवांना एकदा गुंतवणूक करून उत्पादन खर्चात मोठ्या प्रमाणात बचत करता येणार आहे शिवाय यामुळे उत्पादनात (Farmer Income) देखील वाढ होणार असल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे आता मायबाप शासनाने कृषी ड्रोनच्या वापरास शेतकरी बांधवांना प्रोत्साहित करणे हेतू कृषी ड्रोन खरेदीवर अनुदान (Drone Subsidy) देण्याची योजना देखील सुरू केले आहे. केंद्र सरकारने विविध श्रेणीतील शेतकर्यांना 40% ते 50% सबसिडी किंवा 4 ते 5 लाखांपर्यंतची आर्थिक मदत कृषी ड्रोन खरेदीसाठी देण्याची योजना कार्यान्वित केली असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
कृषी ड्रोनवर किती मिळणार बर अनुदान
शेतीवरील खर्च कमी करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी ड्रोनची महत्त्वाची भूमिका राहणार आहेत. यामुळे आता शेतकऱ्यांना कृषी ड्रोन खरेदीवर भरघोस अनुदान दिले जात आहे.
कृषी ड्रोन खरेदी करण्यासाठी देशातील एससी-एसटी प्रवर्गातील शेतकरी, लहान आणि अत्यल्प शेतकरी, महिला शेतकरी आणि ईशान्य राज्यातील शेतकऱ्यांना तब्बल 50% अनुदान म्हणजेच कमाल 5 लाख रुपये अनुदान देण्याची केंद्र सरकारने योजना सुरू केली आहे.
तसेच सर्वसाधारण श्रेणीतील शेतकऱ्यांना कृषी ड्रोन खरेदीसाठी 40% अनुदान म्हणजेच कमाल 4 लाख रुपये अनुदान देण्याची तरतूद देखील सदर योजनेत केंद्र सरकारने समाविष्ट केली आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कृषी ड्रोनचा वापर जास्तीत जास्त वाढावा या अनुषंगाने कृषी ड्रोन खरेदीसाठी शेतकरी उत्पादक संस्थांना सर्वाधिक 75% दराने अनुदान दिले जाणार आहे.
एवढेच नाही तर कृषी यांत्रिकीकरण उपअभियानांतर्गत मान्यताप्राप्त कृषी प्रशिक्षण संस्था आणि कृषी विज्ञान केंद्रांना कृषी ड्रोनवर 100% अनुदान दिले जाईल, जेणेकरून शेतकऱ्यांना कृषी ड्रोन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण देता येईल. निश्चितच शासनाच्या या योजनेमुळे देशात कृषी ड्रोनचा वापर वाढणार आहे.
कृषी ड्रोन अनुदानाचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार आहे
कृषी ड्रोन योजनेंतर्गत आर्थिक अनुदानाचा लाभ घेण्यासाठी, सरकारच्या निकषांनुसार काही पात्रता देखील निश्चित केली गेली आहे, ज्या अंतर्गत-
अर्जदार शेतकरी हा भारताचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच लाभार्थी हा शेतकरी असणे म्हणजेच सातबारा धारक शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार आहे. या योजनेसाठी आर्थिक अनुदानाचा लाभ घेणे हेतू अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची शेतजमीन असावी.
कृषी ड्रोन अनुदानासाठी आवश्यक कागदपत्रे
ज्या शेतकरी बांधवांना कृषी ड्रोन अनुदानाचा लाभ घ्यायचा आहे अशा शेतकरी बांधवांना अर्ज करताना काही कागदपत्रे देखील जोडावी लागणार आहेत. यामध्ये संबंधित अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, शेतजमिनीची कागदपत्रे, बँक खाते तपशील- बँक पासबुकची प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, मोबाईल नंबर आधारशी लिंक केलेला असणे आवश्यक आहे.
येथे अर्ज करावा लागणार बर…!
कृषी ड्रोन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकरी बांधवांना सर्वप्रथम कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइट https://agricoop.nic.in/ वर जावे लागणार आहे.
agricoop.nic.in या वेबसाईटचे होम पेज उघडताच किसान ड्रोन योजना या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
या लिंकवरून अर्ज डाउनलोड करून शेतकरी बांधवांना या अर्जाचे प्रिंट काढावे लागणार आहे.
यानंतर, अर्जातील अटी व शर्ती नीट समजून घेऊन, फॉर्म योग्यरित्या भरावा लागेल.
अर्ज भरून आणि त्यात सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावे लागणार असून कृषी ड्रोन अनुदानासाठी हा अर्ज एका लिफाफ्यात टाकून कृषी विभाग किंवा संबंधित कार्यालयात जमा करावा लागणार आहे. शेतकरी बांधव सरकारने ठरवून दिलेल्या निकषात खरा उतरल्यास त्याला अनुदानाचा लाभ सरकारकडून दिला जाणार आहे.