Business Ideas : बरेचदा लोक त्यांचा व्यवसाय (business) सुरू करण्यासाठी योजना बनवतात पण कधी कधी ती योजना फसते. पण, काही लहान व्यवसाय (small business) देखील आहेत जे तुम्ही तुमच्या घरापासून सुरू करू शकता आणि त्यांना मोठ्या भांडवलाचीही गरज नाही.
या व्यवसायमधून देखील तुम्ही भरपूर नफा कमवू शकतात. स्वत:चा छोटासा व्यवसाय सुरू करून स्वत:ची कंपनी सुरू करणारी आज अनेक यशस्वी उदाहरणे आहेत. चला जाणून घेऊया अशाच काही लहान व्यवसायाबद्दल.

मिनरल वॉटर (Mineral Water Business)
10 हजार रुपयांमध्ये मिनरल वॉटरचा व्यवसाय (Mineral Water Business) सुरू करता येतो. कोणत्याही हंगामात या व्यवसायाची मागणी कमी होत नाही.
तुम्हीही घरबसल्या करू शकता हा व्यवसाय. यासाठी दोन लोकांची आवश्यकता असेल. पाण्याची बाटली पुरविण्यापूर्वी तुम्हाला फक्त फोनवरून ऑर्डर बुक करायची आहे. या फायदेशीर मिनरल पाण्याच्या व्यवसायात पहिल्या महिन्यापासूनच नफा सुरू होतो.
स्नॅक शॉप (Snack Shop)
हा खूप मागणी असलेला व्यवसाय आहे (Breakfast Shop Business). लोकांना अनेकदा सकाळी घरातून बाहेर पडण्याची घाई असते. असे अनेक आहेत जे कुटुंबासोबत राहत नाहीत.
हे लोक उत्तम नाश्ता शोधत असतात. हे काम अर्धवेळ किंवा पूर्णवेळ सुरू करता येते. सुरुवातीला या व्यवसायातून 20 ते 25 हजार कमवता येऊ शकते. यासाठी देखील आपल्याला एक योग्य जागा आवश्यक असेल.
मोबाईल रिपेअरिंग व्यवसाय (Mobile Repairing Business)
सध्या भारतात सुमारे 800 दशलक्ष मोबाइल फोन वापरकर्ते आहेत आणि येत्या तीन वर्षांत त्यांची संख्या 100 कोटींवर पोहोचेल. मोबाईल रिपेअरिंग हा खेड्यापासून लहान शहरापर्यंत एक उत्तम व्यवसाय आहे.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही कुठूनही रिपेअरिंग कोर्स करू शकता. हा कोर्स 03 ते 06 महिन्यांचा आहे. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता
खत आणि बियाणे स्टोअर (Fertilizer and Seed Store)
तुम्ही गावात राहत असाल तर खत आणि बियाणांचे दुकान उघडून चांगले उत्पन्न मिळवता येते. शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात खते आणि बियाणांची गरज असते. तो त्याच्या जवळच्या दुकानातून खरेदी करतो. तुम्ही तुमच्या गावात किंवा शहरात खत आणि बियाणांचे दुकान उघडू शकता. कमी खर्चात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
योग प्रशिक्षक (Yoga Instructor)
योग प्रशिक्षकांची मागणी झपाट्याने वाढली आहे. कारण योगामुळे तुम्ही अनेक आजार आणि तणावापासून मुक्ती मिळवू शकता. योग हे सर्व स्ट्रेस बस्टर तंत्रांपेक्षा चांगले मानले जाते आणि त्याचा चांगला परिणाम जगभरात दिसून आला आहे.
योग प्रशिक्षकांना भारतातच नाही तर परदेशातही मोठी मागणी आहे. जर तुम्ही योग प्रशिक्षक म्हणून हा व्यवसाय केलात तर तुम्हाला कोणतीही गुंतवणूक करावी लागणार नाही. होय तुम्हाला योगाचे ज्ञान असले पाहिजे.