एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम…सरकारची योजना

Published on -

Maharashtra News:नवे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागातर्फे एक योजना जाहीर केली आहे. एक दिवस शेतकऱ्याच्या घरी मुक्काम अशी ही योजना असून कृषिमंत्र्यांसह कृषी विविभागाचे सर्व अधिकारी आपाल्या भागात एक दिवस शेतकऱ्यांच्या घरी जाणार आहेत.

पुढील ९० दिवस ही योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा सत्तार यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे दुःख शेतकऱ्यांच्या अडचणी या जाणून घेण्यासाठी थेट गावातल्या घरामध्ये अधिकारी पोहोचतील. त्यांच्यासोबत राहतील, शेतात जातील, रात्री मुक्काम करतील.

जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी अधिकारी, हे शेतकऱ्यांच्या घरी एक दिवस राहतील.

दिवसभर शेतकऱ्यांची दिनचर्या पाहतील, त्यांच्या अडचणी, त्यांचं जगणं समजून घेतील. ९० दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांत हा मुक्काम असणार आहे.

दिवसभरात शेतकरी काम करत असताना काय अडचणी येतात, बॅंकेच कर्ज घेण्यासाठी काय अडचणी आहेत, शेतकरी का आत्महत्या करतोय याचा आढावा या मोहिमेच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

मोहिम संपल्यानंतर सगळ्या जिल्ह्यांमधील आढावा घेऊन त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe