Maharashtra News:माजी गृहमंत्री अनिल देशमुख शुक्रवारी सकाळी अर्थर रोड कारागृहामध्ये अचानक चक्कर येऊन पडले. त्यांना तातडीने जे जे रुग्णालयात पुढील उपचारासाठी आणण्यात आले आहे.
त्यांचा रक्तदाब वाढला आहे व ईसीजी दोष आढळला. काही दिवसांपूर्वी असाच त्रास झाला होता. त्यामुळे आता काही काळ रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे.

file photo
ईडीने कारवाई केल्यानंतर देशमुख यांना न्यायालयीव कोठडीत अर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलेले आहे. ते पडल्यानंतर छातीत दुखू लागल्याचीही तक्रार केली.
त्यावेळी तुरुंगातील वैद्यकिय आधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. दोन ते तीन दिवस त्यांना अजून जेजे रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.