‘त्या’ चा बालहट्ट पुरवला नाही म्हणून काँग्रेसला धोका – आ. बाळासाहेब थोरात

Ahmednagarlive24
Published:

 श्रीगोंदा : काँग्रेसने विखे कुटुंबाला मंत्रिपदे दिली, विरोधी पक्षनेतेपद दिले, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले. खासदारकीचे तिकीटही तुमच्या मुलालाच पाहिजे. 

त्याचा बालहट्ट पुरवला नाही म्हणून तुम्ही काँग्रेसला धोका देऊन भाजपमध्ये गेला, अशी टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी येथील मेळाव्यात केली. 

लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भोस होते. 

नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, आघाडीचे तिकीट मिळणार नाही याचा अंदाज आल्यावर विखेंनी भाजपत प्रवेश केला. जो आई-वडिलांचे ऐकत नाही, तो आपले काय ऐकणार. म्हणून उत्तरेचे पार्सल परत पाठवा. 

या वेळी आमदार संग्राम जगताप, जि. प. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांनी भाषण केले. या वेळी करण ससाणे, ऋषिकेश भोईटे, अनुराधा नागवडे, मनोहर पोटे, ज्ञानदेव वाफारे, दादासाहेब मुंडे यांचीही भाषणे झाली. 

आमदार राहुल जगताप, नगराध्यक्ष शुभांगी पोटे, नगरसेवक सीमा गोरे, अर्चना गोरे, मधुकर शेलार, सुनील भोस या वेळी उपस्थित होते. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment