फरार सरपंचासह एक जणास अटक

Ahmednagarlive24
Published:

कोपरगाव :- तालुक्यातील मोर्विस येथे महसूल पथकाने गोदावरी नदीपात्रातील वाळू चोरून वाहतूक करताना तलाठी सोमनाथ भाऊसाहेब शिंदे यांनी ट्रॅक्टर पकडला. परंतु यातील आरोपी सरपंचासह तिघे जण फरार झाले होते,

पैकी सरपंच एकनाथ चंद्रभान माळी व त्याचा सहकारी नीलेश गोरख वाघ यास कोंबिंग ऑपरेशन करून पकडण्यात कोपरगाव ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

२१ फेब्रुवारी रोजी कामगार तलाठी सोमनाथ भाऊसाहेब शिंदे मंजूर हे गोदावरी नी पात्रातील वाळूचा अवैधरित्या उपसा करून वाहतूक करीत असलेला ट्रॅक्टर पकडून त्यावर कायदेशीर कारवाई करीत असताना

सोमनाथ शिंदे यांना आरोपी एकनाथ चंद्रभान माळी नीलेश गोरख वाघ व ट्रॅक्टर चालकाने यांनी तुम्ही आमचा ट्रॅक्टर का पकडला, असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करून त्यांचे ताब्यातून ट्रॅक्टर घेऊन तो चालू करून पळून गेले.

सरकारी कामात अडथळा, या प्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून ३ एप्रिल ते ४ एप्रिल दुपारी ५ वाजताच्या दरम्यान आरोपींना पकडण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या कारवाईत वरील आरोपींना मोठ्या शिताफीने जेरबंद करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment