अहमदनगर: महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदारसंघात क्षणाक्षणाला मोठ्या घडामोडी सुरु आहेत. काल (गुरुवार) भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे-पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता.
पण आता निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज अवैध ठरवला आहे. त्यामुळे आता धनश्री विखे-पाटील यांना ही निवडणूक लढवता येणार नाही.

पण असं असलं तरी सुजय विखे-पाटलांचा भाजपकडून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला राम राम ठोकत सुजय विखे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर सुजय विखे यांनी अहमदनगरची उमेदवारी देखील जाहीर झाली होती. यासाठी १ एप्रिलला सुजय विखे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला होता.
पण काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना सुजय विखेंचा पत्नी धनश्री विखे यांनीही भाजपकडून अर्ज भरला होता.
त्यामुळे अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळते याबाबत फारच उत्सुकता निर्माण झाली होती. पण आता निवडणूक आयोगाने सुजय विखे यांचा अर्ज वैध ठरवल्याने अखेर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं आहे.
- व्यवसायात सतत अपयश येतंय? वास्तुशास्त्रातील 7 चमत्कारी उपाय करून पाहा, लक्ष्मीच्या कृपेने तिजोरी पैशांनी गच्च भरेल!
- OnePlus यूजर्ससाठी आनंदाची बातमी! तब्बल 13 जुन्या मॉडेल्सला मिळणार नवीन OxygenOS 16 अपडेट; UI, गेमिंग, बॅटरी सगळं बदलणार
- शुक्रवार उपाय : देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी दर शुक्रवारी लावा तुपाचा दिवा आणि…; घरात येईल सुख-समृद्धी!
- 10 हजारांपेक्षाही कमी बजेटमध्ये विकत घ्या ब्रँडेड स्मार्ट टीव्ही, Amazon वर जबरदस्त टॉप-5 डील सुरू!
- ‘लाडकी बहीण योजने’तून तुमचं नाव काढलं तर नाही?, जून-जुलैचा हप्ता येण्याआधी ‘असं’ तपासा तुमचं नाव आहे की नाही!