सांगली :- कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती व महांकाली साखर कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे नेते मनोहर पाटील यांची अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली.
या आठवडयात राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या होण्याची ही सांगलीतील दुसरी घटना आहे. या घटनेमुळे सांगलीत एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले
कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मनोहर पाटील हे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे रहिवासी होते.
गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग येथे पाटील यांच्यावर अज्ञातांनी धारदार शस्त्राने हल्ला केला.
दरम्यान, पाटील यांना तत्काळ मिरजेतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.