महापालिका पोटनिवडणुकी दरम्यान शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या घेतलेल्या भेटीबद्दल शिवसेनेचे पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली आहे.
शहर राष्ट्रवादीने मदत करण्याची विनंती करण्यासाठी कोरगावकर यांनी आमदार जगताप यांची मागणी केली होती.केडगाव येथील वसंत ठुबे या दिवंगत शिवसेना कार्यकर्त्याचे बंधू प्रमोद ठुबे यांनी ही तक्रार केली आहे.

‘ज्यांनी शिवसैनिकांची (आमच्या भावाची) हत्या केली, त्या लोकांशी हातमिळवणी करायचा आदेश आपण दिला आहे का?’, अशी विचारणाही या पत्रात ठुबे यांनी ठाकरे यांच्याकडे केली आहे.
दीड वर्षांपूर्वी केडगावला झालेल्या महापालिका पोटनिवडणुकीनंतर संजय कोतकर व वसंत ठुबे या शिवसेना कार्यकर्त्यांची हत्या झाली. या प्रकरणात आमदार संग्राम जगताप यांच्यासह अन्य काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना तसेच राष्ट्रवादी व काँग्रेसचे महाविकास आघाडी सरकार आता सत्तेवर असून, महापालिकेच्या प्रभाग ६ च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून शहर राष्ट्रवादीने शिवसेनेच्या उमेदवारास मदत करावी, अशी विनंती कोरगावकर यांनी जगताप यांना भेटून केली होती.
त्या वेळी शिवसेनेचे काही नगरसेवकही उपस्थित होते. या घटनेला प्रमोद ठुबे यांनी आक्षेप घेतला आहे. ‘कोरगावकर-जगताप भेटीचे प्रसिद्धी माध्यमांतील वृत्त वाचून आमच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.
ज्यांच्यामुळे आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले, त्यांच्याशी आघाडी करायची असेल तर आम्ही कोणाकडून न्यायची अपेक्षा बाळगायची?,’ असा सवालही ठुबेंनी या पत्रात केला आहे.
- काय सांगता ! प्लॉट खरेदी केल्यानंतर 12 वर्षांच्या आत घर बांधले नाही तर त्याचा मालकी हक्क रद्द होणार, कुठं झालाय असा निर्णय ?
- संपूर्ण भारतभर प्रवास केला तरी सुद्धा ‘या’ यादीतल्या लोकांना एकही रुपया Toll Tax भरावा लागत नाही ! पहा संपूर्ण यादी…
- ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणार आणखी 3 नवीन स्मार्टफोन ! Vivo , Samsung , Realme करणार धमाका
- 5 वर्षात मिळणार 12 लाख 30 हजार रुपयांचे व्याज! पोस्टाची ‘ही’ योजना ठरणार गेमचेंजर
- शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी डबल धमाका ! ‘ही’ कंपनी एकाचवेळी देणार Bonus Share आणि स्टॉक स्प्लिटचा लाभ