श्रीरामपूरमध्ये शाळकरी मुलीचा विनयभंग

Published on -

श्रीरामपूर :- येथील कन्या विद्यालयात शिकणाऱ्या पंधरा वर्षांच्या विद्यार्थिनीला शाळेतून घरी जाताना त्रास देणाऱ्या संदीप कांबळे (डुडे, रामनगर वॉर्ड १) या तरूणाविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रासलेल्या विद्यार्थिनीने फिर्यादीत म्हटले आहे, विद्यालयातून घरी जात असताना कांबळे पंधरा दिवसांपासून त्रास देत होता. गुरुवारी सायंकाळी त्याने आवाज दिला, पण आपण त्याच्याकडे पाहिले नाही. नंतर त्याने डावा हात धरून विनयभंग केला.

त्याचा हात जोराने झटकत घाबरून मी पळाले, तेव्हा त्याने शिवीगाळ करून धमकीही दिली. पोलिसांनी कांबळे याच्याविरुद्ध विनयभंग व बालकांचा अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सज्ञान असून तो शाळेबाहेरील आहे. तो काहीही कामधंदा करत नसल्याची माहिती मिळाली.

आरोपीचा शोध सुरू असून अद्याप अटक केली नसल्याचे पोलिस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक संभाजी पाटील करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe