करोना व्हायरसच्या भीतीमुळे सध्या चिकनच्या मागणीत घट झाली आहे. नागरिकांनी चिकन घेणे कमी केले आहे. या दिवसात चिकनची विक्री निम्म्याने घटली आहे.
चीनसह अन्य देशांत फैलावलेल्या करोना व्हायरसची नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे. या भीतीपोटी चायनीज फास्ट फूडची मागणी घटली आहे.
नागरिकांकडून चायनीज फूड खाणे टाळले जात आहे. त्यामुळे चायनीज खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर गर्दी कमी झाली आहे.
हा व्हायरस चीनमधून आल्याने चायनीज खाणे नको बाबा… असा विचार करून या खाद्यपदार्थांचा मोह टाळला जात आहे. यामुळे चायनीज खाद्यविक्रेत्यांना मात्र फटका बसला आहे.
चीनमधील वुहान प्रांतात करोना व्हायरसची मोठ्या प्रमाणात लागण झाली आहे. चीनसह अन्य देशांतही हा व्हायरस फैलावत आहे. भारतातही या आजाराचे रुग्ण आढळले आहेत.
त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. या आजाराबाबत समाजात अनेक गैरसमजही पसरले आहेत.
त्यामुळे संभ्रमाचे वातावरणही आहे. हा व्हायरस चीनमधून आल्यामुळे चायनीज खाद्यपदार्थही नकोत, अशी भावना नागरिकांत आहे. चायनीज नूडल्स, सूप यांसारख्या खाद्यपदार्थांना मागणी घटली आहे.