अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मी मैदान सोडून पळणाऱ्यातला नाही. महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार येणार नाही तोपर्यंत मी महाराष्ट्र सोडून कुठेही जाणार नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले.
तसेच ठाकरे सरकार विश्वासघातकी असल्याने ते टिकणार नाही, असेही त्यांनी म्हटले. मुंबईत शनिवारी विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचा १७ वा वर्धापन दिन फडणवीस यांच्या उपस्थितीत साजरा झाला त्या वेळी ते बोलत होते.
जनतेने तर आपल्याला मते दिली, त्यांनी राजकीय गणिते बिघडवली आणि राजकीय हाराकिरी करुन आपले सरकार होऊ दिलं नाही. हे जे सरकार येथे काम करत आहेत, हे जनतेने निवडून दिलेले सरकार नाही.
जनतेने निवडून दिलेलं सरकार तर भाजपचे होतं. ठाकरे सरकार हे विश्वासघातकी सरकार आहे ते फार काळ टिकणार नाही. आम्ही बदल्याच्या भावनेने कधीही वागलो नाही. मात्र हे सरकार प्रगती नाही तर स्थगिती सरकार आहे.
एवढेच नाही तर शिवस्मारकाचे काम या सरकारने जाणीवपूर्वक थांबवले असा आरोपही त्यांनी यावेळी केला. लोकशाहीची मूल्य या सरकारला मान्य नाहीत आमच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला तर आम्हीही रस्त्यावर उतरू आणि तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ. एवढ्या लवकर सत्तेचा माज डोक्यात जाऊ देऊ नका. पुन्हा एकदा शिवसंग्राम आणि आपल्या युतीचे सरकार राज्यात आणू, असेही ते म्हणाले.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com