अहमदनगर ब्रेकिंग : भावानेच केला दगडाने ठेचुन सख्या भावाचा खून…कारण वाचून बसेल तुम्हाला धक्का !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर जिल्ह्यात भावानेच सख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी पोलिसांनी तिघाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी पसार झाले आहेत.   

बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याचा राग मनात धरून सख्या भावानेच नातेवाईकांच्या मदतीने भावाचा दगडाने ठेचुन व चाकू कुऱ्हाड अशा हत्यारांनी भोसकुन खून केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील सोनविहिर येथे शुक्रवारी घडली.

वृध्देश्वर पुंजाराम काळे (वय ४०) असे मृताचे नाव असून त्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन सुरेश पुंजाराम काळे रा.सोनविहीर, विकास फुलसिंग भोसले, रवि फुलसिंग भोसले (दोघे रा.मोरचिंचोरा) ता.नेवासा यांच्या विरुध्द शेवगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पसार आरोपींचा शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली बोधेगाव पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास पावरा, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वामन खेडकर, पो.कॉ.राजेंद्र ढाकणे, पो कॉ.नामदेव पवार हे पुढील तपास करीत आहेत.

http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2020/02/08/ahmednagar-breaking-corona-virus-suspected-patient-admits-to-hospital/

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment