Suresh Raina Retirement : भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने (Suresh Raina) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याचे जाहीर आहे. सोशल मीडियावर (Social Media) एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली.
15 ऑगस्ट 2020 रोजी रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Retirement) घेतली होती. परंतु, तो उत्तर प्रदेशकडून (UP) देशांतर्गत क्रिकेट खेळत होता.

रैनाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली
इतर लीग खेळण्यासाठी मोकळा : रैना
रैना गाझियाबादमध्ये (Ghaziabad) सतत प्रशिक्षण घेत आहे आणि त्याने एका वृत्तपत्राशी केलेल्या संवादात खुलासा केला आहे की तो परदेशी लीगमध्ये खेळण्याची तयारी करत आहे.
तो म्हणाला, “मी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. मी त्याबाबत बीसीसीआयला (BCCI) कळवले आहे. सध्या मला आणखी 2-3 वर्षे क्रिकेट खेळायचे आहे. आता मी इतर लीगमध्ये खेळण्यासाठी मोकळा आहे.
रैना लवकरच मैदानात परतणार आहे
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजसह मैदानात परतणार असल्याची माहितीही रैनाने दिली आहे. “माझ्याशी दक्षिण आफ्रिका, यूएई आणि श्रीलंका येथे होणाऱ्या लीगद्वारे संपर्क साधण्यात आला आहे. सध्या काहीही स्पष्ट नाही, परंतु परिस्थिती स्पष्ट होताच मी तुम्हाला कळवीन,” तो म्हणाला.
पुढील वर्षापासून दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि यूएईमध्ये (UAE) नवीन टी-20 लीग (T-20 League) सुरू होत आहेत.
आयपीएल 2022
आयपीएल 2022 मध्ये रैनाला कोणीही विकत घेतले नव्हते
आयपीएल 2021 मध्ये खेळल्यानंतर, रैनाला 2022 च्या हंगामापूर्वी चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने सोडले. त्याला लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. तेव्हापासून त्याच्या भवितव्याची चर्चा होती.
2020 च्या मोसमातही रैना खेळला नव्हता. तो सीएसकेसोबत यूएईला गेला होता पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तो भारतात परतला.
करिअर
रैनाची आयपीएल कारकीर्द अप्रतिम राहिली आहे
आयपीएलच्या इतिहासात 5 हजार धावांचा टप्पा गाठणारा रैना पहिला फलंदाज ठरला. आयपीएलच्या 12व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (RCB) विरुद्धच्या 177व्या सामन्यात त्याने हे स्थान गाठले.
रैनाने आयपीएलच्या सलग सात हंगामात 400 हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटर आहे. लीगमधील 205 सामन्यांमध्ये त्याने 5,528 धावा केल्या आहेत.