श्रीगोंदे :- तालुक्यातील निमगाव खलू येथे मुलानेच पित्याचा खून केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. दिलीप ऊर्फ दिल्या त्रिंबक भोसले असे मृताचे नाव आहे.
त्याचा मुलगा गोगल्या याला पोलिसांनी अटक केली आहे. दिलीपचा मुलगा गोगल्या ऊर्फ बुट्या भोसले हा थोडा वेडसर असून त्याच्यावर दौंड पोलिस ठाण्यात ड्रॉपचा गुन्हा दाखल आहे.

त्याने या अगोदरही आई-वडिलांना मारहाण केली होती. रविवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास वडील झोपेत असताना गोगल्याने त्यांच्या डोक्यात जबर घाव घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सकाळी उठल्यावर मुलगी, जम्बी पवार हिला वडिलांचा मृत्यू झाल्याचे दिसले. गोगल्या घरातून पळून गेला होता.
जम्बीच्या फिर्यादीवरून गोगल्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी काही तासांतच त्याला अटक केली.
- लॉटरीत मिळालेलं म्हाडाचे घर विक्रीबाबत नियम काय आहेत ? वाचा सविस्तर
- मुंबईहुन ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन !
- मुंबईकरांसाठी खुशखबर ! शहरात सुरू झाली ई – बाईक टॅक्सी सेवा, ‘या’ 3 कंपन्यांना मिळाले तात्पुरते परवाने, भाडे किती असणार?
- यात्रीगण कृपया ध्यान दे….! अहमदनगर रेल्वे स्थानकाचे नाव बदलले, मध्य रेल्वेची अधिसूचना निघाली
- नवीन व्यवसाय सुरू करायचाय ? मग 3 लाख रुपयांमध्ये मोबाईल दुकानाचा व्यवसाय सुरू करा, पहिल्या दिवसापासून होणार कमाई