अहमदनगर :- केडगावमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी शिवसेनेने कॅण्डलमार्च काढून श्रध्दांजली वाहिली.
कॅण्डलमार्चमुळे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह ८० जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

केडगावातील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची ७ एप्रिल २०१८ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने शिवसेनेने कॅण्डलमार्च काढून दोन्ही शिवसैनिकांना श्रध्दांजली वाहिली.
राठोड यांच्यासह शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, योगिराज गाडे आदी मार्चमध्ये सहभागी झाले होते.
केडगाव गावठाण, अंबिका बसस्टॉप, शाहूनगर मार्गे सुवर्णानगर असा कॅण्डलमार्च काढण्यात आला. मात्र, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग झाला.
कोतवाली पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल नवनाथ गोरे यांच्या फिर्यादीवरून राठोड, गाडे, सातपुते यांच्यासह ८० जणांच्या विरूध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- GST On Gold: 1 लाखाचे सोने खरेदी कराल तर किती द्यावा लागणार जीएसटी? बघा फायद्याची माहिती
- Onion Rate: आता सरकारच्या माध्यमातून ग्राहकांना मिळेल 5 ते 10 रुपयांनी स्वस्त कांदा! कसे ते वाचा?
- Cotton News: तुम्हालाही तुमच्या कापसाला मिळवायचा 8110 रुपयाचा हमीभाव? तर ‘हे’ काम करा…
- Investment Scheme: 5 लाखाची गुंतवणूक मिळवून देईल तुम्हाला 15 लाख! वाचा संपूर्ण माहिती
- NSC Scheme: कसे मिळेल 5 वर्षात 5 लाख रुपये व्याज? समजून घ्या संपूर्ण गणित