अहमदनगर :- मुलाच्या भाजप प्रवेशानंतर राजकीय कोंडीत सापडलेले विरोधी पक्षनेतेे राधाकृष्ण विखे यांनी पुत्रप्रेमापोटी अखेर भाजपच्या स्थानिक नेत्यांशी मेळ बसवत जुळवून घेतले.
मंगळवारी डॉ. सुजय यांच्या सावेडीतील संपर्क कार्यालयात राधाकृष्ण विखे यांनी शहर भाजप, शिवसेनेच्या नेत्यांची बैठक घेतली.

या बैठकीला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली.पालकमंत्री राम शिंदे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली.
राधाकृष्ण विखे यांनी प्रथमच पुत्र डॉ. सुजय यांच्यासाठी नगर शहरात भाजप व सेनेच्या नेत्यांबरोबर बैठक घेतली. त्यामुळे विखे भाजपमध्ये दाखल होणार यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
प्रथमच राधाकृष्ण विखे यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या सावेडी येथील पारिजात चौक परिसरातील संपर्क कार्यालयात पालकमंत्री राम शिंदे, शिवसेनेचे विधानसभेचे उपसभापती विजय औटी, जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांच्यासमवेत एक बैठक घेतली.
यात त्यांनी दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचा आढावा विखे यांनी घेतला. डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशानंतर राधाकृष्ण विखे यांची राजकीय कोंडी झाली होती.
आघाडीचा धर्म पाळला, तर पुत्राच्या विरोधात प्रचार केल्यासारखे होईल. त्यामुळे विखे यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात अप्रत्यक्षपणे डॉ. सुजय यांचा प्रचार सुरू केला होता.
पुत्रप्रेम व राजकीय कोंडी या द्विधा मनस्थितीत सापडलेले राधाकृष्ण विखे आता पुत्रासाठी भाजपबरोबर थेट प्रचारात उतरले आहेत.
यापूर्वी पडद्यामागून प्रचार करणारे विखे थेट भाजपच्या तंबूत जाऊन पोहोचले आहेत. या बैठकीत त्यांनी डॉ. सुजय विखे हे या निवडणुकीत नवे आहेत. असे सांगून दिलीप गांधी यांचे आभार मानले.
- नोकरी नव्हे, व्यवसायात चमकतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली; कमावतात अफाट संपत्ती आणि नाव!
- MBBS मध्ये प्रवेश मिळाला नाही?, मग ‘हे’ 5 मेडीकल कोर्स देतील चांगल्या पगाराची नोकरी!
- टनभर सोनं, अब्जावधींचं दान! भारतातील’या’ मंदिराची संपत्ती इतकी अफाट की एखादा देश चालू शकतो
- रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! भारतीय रेल्वेने लाँच केले जबरदस्त अँप्लिकेशन, नव्या एप्लीकेशनच्या विशेषता जाणून घ्या
- खूप प्रॅक्टिकल असतात ‘या’ जन्मतारखेच्या मुली, भावनांमध्ये न अडकता व्यावहारिकपणे घेतात कोणताही ठोस निर्णय!