आरोपीला कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Ahmednagarlive24
Published:

मुंबई:- हिंगणघाट जळीता हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलीआहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे.त्याला कठोरातील कठोऱ शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल. अशा घटनेत तपासात कुचाराई होऊ दिली जाणार नाही.

पीडीता, तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा रितीने चालविण्यात येईल.

त्यासाठी अँड. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment