अहमदनगर : नगर शहराचे आमदार असलो, तरी शहराबरोबरच आसपासच्या खेडेगावांच्या विकासासाठी गेल्या साडेचार वर्षांत प्रामाणिक प्रयत्न केले.
नगर शहराला जोडणाऱ्या नगर तालुक्यातील बहुतांश रस्त्यांची कामे आपण शासनाकडून मंजूर करून आणली असून त्यासाठी सुमारे १५ कोटींचा निधी प्राप्त झालेला आहे.

यातील काही रस्त्यांची कामे सुरूही झाली आहेत. आपल्याला विकास कामांचा हिशोब मागणाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन याची माहिती घ्यावी,
असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे विरोधी उमेदवार तसेच शिवसेनेच्या नेत्यांना लगावला आहे.
नगर तालुक्यातील निंबळक व देहरे जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
जगताप म्हणाले, नगर शहराच्या विकासाबरोबर उपनगराच्या विकासाला चालना देण्यासाठी शहराला व उपनगराला जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणे गरजेचे आहे.
यासाठी वारंवार शासन दरबारी पाठपुरावा केल्यामुळे शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे.
- GST On Gold: 1 लाखाचे सोने खरेदी कराल तर किती द्यावा लागणार जीएसटी? बघा फायद्याची माहिती
- Onion Rate: आता सरकारच्या माध्यमातून ग्राहकांना मिळेल 5 ते 10 रुपयांनी स्वस्त कांदा! कसे ते वाचा?
- Cotton News: तुम्हालाही तुमच्या कापसाला मिळवायचा 8110 रुपयाचा हमीभाव? तर ‘हे’ काम करा…
- Investment Scheme: 5 लाखाची गुंतवणूक मिळवून देईल तुम्हाला 15 लाख! वाचा संपूर्ण माहिती
- NSC Scheme: कसे मिळेल 5 वर्षात 5 लाख रुपये व्याज? समजून घ्या संपूर्ण गणित