श्रीरामपूर तालुक्यात रात्रीच्या वेळेस गस्तीवर असणाऱ्या पीएसआय पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार काल रात्री घडला . पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार घडल्याने श्रीरामपुरात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , कर्जत येथील जेलमधून ४ आरोपी काल फरार झाल्यानंतर जिल्हाभर पोलीसांनी नाकेबंदी केली. श्रीरामपुरातही नेवासा रोडवर बाजार समितीच्या पेट्रोल पंपासमोर पोलीसांची नाकेबंदी सुरू होती.
रात्री ११ च्या सुमारास या ठिकाणी नाके बंदीसाठी डयुटीवर पीएसआय समाधान सुरुडे आणि त्यांचे काही पोलीस सहकारी होते. त्यावेळी पांढऱ्या रंगाची एक गाडी आली पीएसआय सुरुडे यांनी ती गाडी थांबवण्यासाठी हात केला.
मात्र , सदर गाडी चालकाने गाडी नथांबविता गाडी थांबवण्यासाठी पुढे आलेल्या पीएसआय सुरकडे आणि त्यांच्या कर्मचान्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला . गाडी अंगावर येत आहे असे पाहुन पोलीस बाजूला सरकले.
त्यानंतर त्यांनी तातडीने शहर पोलीसात फोन करून संबंधित गाडीचे वर्णन व क्रमांक कळविला. गांधी पुतळयाजवळ ही गाडी आली असता तेथे पोलीसांनी ही गाडी अडविण्याचा प्रयत्न केला . मात्र येथेही गाडी थांबली नाही .
शेवटी पोलीसांनी राममंदिर चौक परिसरातील ‘ एम . एच . १७ हॉटेलजवळ गाडी अडवली गाडीचालक हा त्यावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. याठिकाणी त्याने पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.
पोलीसांनी सदर चालकास पोलीस स्टेशनला नेले . दरम्यान, सदर चालक हा एका राजकीय गटाचा कार्यकर्ता असल्याने त्याने संबंधित आपल्या काही मित्रपरिवार आणि नेत्यांना बोलविले.
रात्री पोलीस स्टेशनला याठिकाणी मोठी गर्दी जमली यामध्ये नगरपालिकेचे एक पदाधिकारी, एक – दोन माजी नगरसेवक , एका नगरसेविकेचे पती, माजी आमदाराचे बंधू आदी याठिकाणी आले होते.
पोलीसांबरोबर या ठिकाणी सदर गाडी चालकाने चांगलीच हुज्जत घालत ‘ चुकीचा प्रकार केल्याचे सांगण्यात येते . मात्र , त्यास पोलीस अधिकाऱ्यांकडून दुजारा मिळाला नाही. याप्रकरणी संबंधित कार्यकर्ता असणान्या गाडी चालकाला पोलीसांनी आत टाकल्याचे समजते.