अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी इंटरनेट आणि वायफाय बंदी !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर ;- इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी नगरमधील परीक्षा केंद्रांवर इंटरनेट आणि वायफाय बंदी करण्यात आली आहे परीक्षा केंद्रावरील कॉपीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हे निर्देश दिले आहेत. 

आज जिल्हाधिकारी राहल द्विवेदी यांनी दक्षता समितीसोबत बैठक घेतली . यावेळी जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांचा आणि परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला . यावेळी परीक्षा सुरू असताना परीक्षा केंद्रावर इंटरनेट आणि वायफास सेवा बंद ठेवण्याचे निर्देश दिले. 

तसेच या आदेशाचे तंतोतंत पालन करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले . बारावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात केवळ एक संवेदनशील केंद्र आहे . तर दहावीच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकही संवेदनशील केंद्र नाही.

 नगर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेसाठी १७८ तर बारावीच्या परीक्षेसाठी ९९ केंद्र निश्चित करण्यात आली आहेत . दरम्यान , महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे . 

दहावीची परीक्षा मार्चपासून सुरू होणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी आहे . परीक्षेपूर्वी कनिष्ठ महाविद्यालय किंवा शाळेकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल. विद्यार्थ्यांनी त्या वेळापत्रकावरून खात्री करूनच परीक्षेस प्रविष्ट व्हावे , अशी सूचना राज्य परीक्षा बोर्डाने यापूर्वीच दिली आहे . 

परीक्षेसंदर्भातील मंडळाच्या सर्व सूचना आपण मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकाल , बारावी आणि दहावीचं वेळापत्रक मंडळाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेलं आहे .

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment