मुंबई : हिंगणघाट येथील पीडित तरूणीला न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे आरोपीला लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे. अन्यथा हैदराबाद येथे झालेल्या एन्काउंटरचे समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये, अशी प्रतिक्रिया अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिली.
हिंगणघाट जळीतकांडातील तरुणीचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावर विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यूवर अनासपुरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
हिंगणघाटमधील पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून हळहळ वाटत आहे. एक सात्विक संतापही येत आहे. काहीही कारण नसताना एखाद्याला प्राण गमवावा लागला. ही समाजासाठी दुर्देवाची गोष्ट आहे.
त्यामुळे केंद्र सरकार आणि न्यायव्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की, त्यांनी अशा प्रकरणांचा लवकरात लवकर छडा लावावा. आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे. अन्यथा हैदराबाद येथे झालेल्या एन्काउंटरचे समर्थन करण्याची वेळ नागरिकांवर येऊ नये, असे अनासपुरे यांनी म्हटले आहे