संगमनेर : तालुक्यातील एका महिलेसह तिच्या मित्राला पळवून नेवून महिलेचा खून करून तिच्या मित्राला विषारी औषध पाजल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,गाडी खराब झाली तू दावे घेवून ये, असा निरोप देवून महिलेला घराबाहेर बोलवून तिघाजणांनी तिला कारमधून पळवून नेले. ही घटना रविवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली.

त्यानंतर सदर महिलेचा खून करुन तिचा मृतदेह संगमनेर तालुक्यातील निझर्णेश्वराच्या जंगलात आणून टाकला.
तिला दावे घेवून ये, सांगणारा तिचा मित्र याला देखील पळवून नेणार्यांनी विषारी औषध पाजल्याने त्याला संगमनेरातील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
ही घटना मंगळवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मंदाबाई लहानू जोंधळे (वय 45, रा. कोकणगाव, ता. संगमनेर) असे मयत महिलेचे नाव आहे.
रविवारी पहाटे तिघा जणांनी कारमधून जावून मंदाबाई जोंधळे हिचा मित्र संजय चांगदेव पावसे याला बाहेर बोलावून घेतले. तेथून त्याला कोकणगाव रोडवर आणले.
सदर तिघांनी संजय यास दमबाजी करत मंदाबाई हिला फोन करुन बोलावून घेण्यास सांगितले.
त्यानुसार संजय याने मंदाबाई हिला फोन केला की, गाडी खराब झाली आहे, तू दावे घेवून ये. त्यानंतर मंदाबाई कोकणगाव रोडवर आली.
तेथे तिला कारमध्ये बसविण्यात आले. कार तेथून कोल्हारच्या दिशेने गेली. त्यावेळी कारमध्ये संजय पावसे देखील होता.
दरम्यान दिवसभर मंदाबाई जोंधळे ही घरी आली नाही. तिचा मुलगा विद्येश्वर जोंधळे हा बाहेरगावी गेला होता. तो घरी आल्यानंतर त्याने आईचा शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.
आजोबांनी सांगितले की, तिला पहाटे कुणाचा तरी फोन आला आणि ती रोडकडे गेली. त्यानंतर परत आली नाही. विद्येश्वर याने आईच्या फोनवर फोन केला.
एकदा रिंग वाजली. मात्र त्यानंतर मोबाईल बंद झाला. त्याने रात्री उशिरापर्यंत फोन लावण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल बंदच होता.
अखेर सोमवारी रात्री 10 वाजता विद्येश्वर जोंधळे याने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आई मंदाबाई जोंधळे ही बेपत्ता झाल्याची खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली.
मंदाबाई जोंधळे हिला तिघांनी कारमधून पळून नेले. मलाही दमदाटी करत कारमध्ये नेले. मंदाबाई हिला डोक्यातून तोंडापर्यंत प्लास्टीक पिशवी टाकून गदमरुन मारले.
मलाही विषारी औषध पाजले. तिचा मृतदेह निझणेश्वराच्या जंगलात टाकला आहे. त्यांच्या तावडीतून मी सुटका करत पळालो.
असे मंगळवारी सकाळी 11.30 वाजता गावात आलेल्या मंदाबाईचा मित्र संजय पावसे याने ग्रामस्थांना सांगितले.
ग्रामस्थांनी तातडीने संजय पावसे यास संगमनेर येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
घटनेची माहिती कोकणगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी जोंधळे यांनी संगमनेर तालुका पोलिसांना दिली.
माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. निझर्णेश्वराच्या जंगलात घायपाताच्या चारीत मंदाबाई जोंधळे हिचा मृतदेह पडलेला होता.
पोलिसांनी पंचनामा केला. सदर मृतदेह शवविच्छेदनासाठी कॉटेज रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर सदर मृतदेह पोेलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?
- नवीन घर खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा, लाखो रुपयांचा खर्च वाचणार, पहा…
- घरात साप शिरला तर घाबरू नका, फक्त ‘हे’ उपाय करून पहा, साप असा पळणार की परत मागे फिरणार पण नाही