श्रीगोंदा पोलिसांनी मागील काही दिवसांपासून बेशिस्त वर्तणूक करणाऱ्या, कायदा मोडणाऱ्या लोकांकडे आपला मोर्चा वळवला असून त्याचाच एक भाग म्हणून श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दुपारी अचानक शहरातील काही कॅफे सेंटरवर जाऊन त्यांची तपासणी केली.
शहरात कॅफे सेंटरमध्ये महाविद्यालयाचे तरुण तरुणी अश्लील चाळे करतात, काही गैरप्रकार या कॉफी सेंटरमध्ये होत असल्याच्या अनेक तक्रारी पो नि जाधव यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे आज जाधव यांनी शहरातील कॉफे सेंटरवर धाड टाकली.
तेव्हा त्यांना त्याठिकाणी काही महाविद्यालयीन तरुण,तरुणी अश्लील चाळे करताना रंगेहात आढळून आले. त्या तरुण, तरुणींना पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणले त्यानंतर त्यातील तरुणांना पोलीसी पाहुणचार देत संबंधित तरुण,तरुणींवर सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे केल्याबद्दल कायदेशीर कारवाई केली.
नंतर त्यांच्या पालकांना बोलावून त्यांना समज देऊन सोडण्यात आले शहरात मागील काही दिवसांपासून नव्याने अनेक कॅफे उघडण्यात आलेले आहेत. यातील बऱ्याच कॅफे सेंटरमध्ये नको ते उद्योग सुरू असतात याबाबत अनेक जाणकार लोकांनी पोलिसांना माहिती दिली होती त्याची दखल घेत पोलिसांनी ही कारवाई केली.