श्रीरामपूर :- येथील कृष्णा बाबासाहेब साबळे (वय ४१) यांनी शहरातील कालव्यात आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.
अशोकनगर परिसतील कालव्यात नागरिकांना साबळे यांचा मृतदेह आढळून आला.
त्यांनी तातडीने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. त्यांच्या पश्चात आई, वडील, चुलते, पत्नी, भाऊ, तीन बहिणी, चुलत भाऊ असा परिवार आहे.
साबळे शुक्रवारपासून बेपत्ता होते. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.