शिर्डी विमानतळामुळे भाविकांना मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ 

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी : देश व विदेशातील साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डी येथे राज्य सरकारच्या महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने उभारलेल्या साईबाबा इंटरनॅशनल एअरपोर्टवर लँडिंग आणि टेकऑपसाठी उच्चत्तम दर्जाची यंत्रणाच अद्याप बसविण्यात आलेली नसल्याने दृष्यमानतेची (व्हीजीबीलिटी) अडचणींचा सामना विमानांना करावा लागत आहे.

धुके अथवा खराब वातावरणाने विमान कंपन्यांना अचानकपणे विमानांचे लँडिंग दुसरीकडे करावे लागत असल्याच्या घटना वारंवार घडू लागल्याने विमान कंपन्याप्रमाणे प्रवाशांनी विमानतळ प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

अचानक विमान रद्द अथवा दुसरीकडे लँडिंग केले जात असल्याने भाविकांना मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते घाईघाईत शिर्डी विमानतळाचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून म्हणजे २०१८ पासून शिर्डीत विमान सेवेला सुरुवात झाली.

उद्घाटन सोहळ्यात दोन महिन्यात नाईट लँडिंगसह सर्व सुविधा पूर्ण करण्याची ग्वाही महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानंतर दोन वर्ष उलटूनही अद्याप नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करण्यात विमानतळ विकास कंपनीला अपयश आले आहे. प्रवाशांसाठी टर्मिनल इमारत सुद्धा अद्ययावत नाही.

याबाबत शिर्डी विमानतळाशी संबंधित जबाबदार असणारे उडवाउडवीची उत्तरे देवून वेळकाढूपणा करीत आहे. येत्या दोन वर्षांपासून केवळ विमान सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होईल, नाईट लँडिंगची व्यवस्था सुरू होईल, असे सांगितले जाते. अद्याप टर्मिनलचे काम सुरू होऊ शकले नाही. निधीची कमरता नसल्याचे सांगितले जाते. मग नेमका वेळ का लावता जातो, असा सवाल विमान प्रवाशांतून केला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment